दीड महिन्याने कोरोना केसेस २ लाखांपेक्षा कमी

दीड महिन्याने कोरोना केसेस २ लाखांपेक्षा कमी

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत एक लाख ९६ हजार ४२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात यापूर्वी १३ एप्रिल रोजी दोन लाखांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी देशात २४ तासांत एक लाख ८४ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला असला तरी देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. काल (सोमवारी) देशात ३५११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तीन लाख २६ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ने सांगितलं की, भारतात काल (सोमवारी) कोरोनामुळे २० लाख ५८ हजार ११२ सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. काल देशात एकूण ३३ कोटी २५ लाख ९४ हजार १७६ सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात काल (सोमवारी)  ४२,३२० कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर २२,१२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल ३६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात काल एकूण ३,२४,५८०  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुख, १०० कोटी प्रकरणात, ईडीकडून पाच बारमालकांची चौकशी

शिवसेनेचा ‘हा’ मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट?

‘सुपर स्प्रेडर’ शेतकरी आंदोलन

ठाणे पोलीस आयुक्तपदी जयजित सिंग 

आजपर्यंत एकूण ५१,८२,५९२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल ३६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३२,७७,२९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,०२,१९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात २७,२९,३०१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Exit mobile version