देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. कालच्या दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास १९ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ४ हजार कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती, मात्र आजच्या दिवसात काहीसा दिलासा मिळाला आहे.
India reports 3,43,144 new #COVID19 cases, 3,44,776 discharges and 4,000 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,40,46,809
Total discharges: 2,00,79,599
Death toll: 2,62,317Active cases: 37,04,893
Total vaccination: 17,92,98,584 pic.twitter.com/rLz1Fvz1Oa
— ANI (@ANI) May 14, 2021
गेल्या आठवड्यात २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. गेल्या २४ तासात भारतात ३ लाख ४३ हजार १४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात ३ लाख ४४ हजार ७७६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
हे ही वाचा:
अरबी समुद्रात वादळाची निर्मिीती; महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा
अक्षय्य तृतीयेच्या मोदींनी दिल्या शुभेच्छा
भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले
कोरोनाविरोधात भारत सरकारने काय केले? सत्य आणि गैरसमज
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ४० लाख ४६ हजार ८०९ वर गेला आहे. आतापर्यंत २ लाख ६२ हजार ३१७ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात २ कोटी ७९ हजार ५९९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३७ लाख ४ हजार ८९३ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.