कोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांनी वाढ

कोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांनी वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दीड हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ५० हजार ४० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार २५८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

गेल्या २४ तासात भारतात ५० हजार ४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार २५८ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ५७ हजार ९४४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २ लाख ३३ हजार १८३ वर गेला आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९२ लाख ५१ हजार २९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ लाख ९५ हजार ७५१ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ५ लाख ८६ हजार ४०३ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल 

इक्बाल कासकरची १५ तास कसून चौकशी

गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!

शेती कायद्याविरोधातील आंदोलकांचा धुडगूस

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ३२ कोटी १७ लाख ६० हजार ७७ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version