कोरोना रुग्णसंख्येत ७५ दिवसांचा निचांक

कोरोना रुग्णसंख्येत ७५ दिवसांचा निचांक

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत १० हजारांनी घट झाली आहेच, मात्र गेल्या ७५ दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात ६० हजार ४७१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात २ हजार ७२६ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात ६० हजार ४७१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ७२६ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात १ लाख १७ हजार ५२५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९५ लाख ७० हजार ८८१ वर गेला आहे. देशात २ कोटी ८२ लाख ८० हजार ४७२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ३१ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ९ लाख १३ हजार ३७८ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

शिवसेना आमदाराच्या स्टंटबाजीमुळे कंत्राटदाराचा जीव धोक्यात?

पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात भाजपाचे राज्यपालांकडे निवेदन

पीएम केअर्स…८५० जिल्ह्यांत उभे राहतायंत ऑक्सिजन प्लॅन्ट

जमीन खरेदी विषयावरून राम मंदिर विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २५ कोटी ९० लाख ४४ हजार ७२ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version