कोरोना बाधितांच्या संख्येत २५ हजारांची घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

कोरोना बाधितांच्या संख्येत २५ हजारांची घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत २५ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात १ लाख २७ हजार ५१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात २ हजार ७९५ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींची संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या चोवीस तासात भारतात १ लाख २७ हजार ५१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ७९५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ५५ हजार २८७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ८१ लाख ७५ हजार ४४ वर गेला आहे. देशात २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ८९५ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर १८ लाख ९५ हजार ५२० इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

नदीत मृतदेह टाकणाऱ्या दोघांना अटक

अजय देवगणने ६० कोटीला घेतले नवे घर

…इट्स कोल्ड ब्लडेड मर्डर

मेट्रो घडवणारे फडणवीस राहिले बाजूला, बिघडवणारे मुख्यमंत्री ठाकरे उद्घाटन करत फिरतायत

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २१ कोटी ६० लाख ४६ हजार ६३८ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version