कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल १७ हजारांनी घट

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल १७ हजारांनी घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर काहीशी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल १७ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात २ लाख ५९ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. कालच्या दिवसात ४ हजार २०९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या २४ तासात भारतात २ लाख ५९ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार २०९ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३ लाख ५७ हजार २९५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ६० लाख ३१ हजार ९९१ वर गेला आहे. देशात २ कोटी २७ लाख १२ हजार ७३५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २ लाख ९१ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ३० लाख २७ हजार ९२५ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

पश्चिम बंगालमधील पिडीत हिंदूंच्या मदतीसाठी विहिंपचा पुढाकार

लसीकरणाचा गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version