तीन महिन्यांनी कोरोना रुग्णसंख्या ४३ हजारांखाली

तीन महिन्यांनी कोरोना रुग्णसंख्या ४३ हजारांखाली

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत ११ हजारांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या ९१ दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात ४२ हजार ६४० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार १६७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात ४२ हजार ६४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार १६७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ८१ हजार ८३९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९९ लाख ७७ हजार ८६१ वर गेला आहे. देशात २ कोटी ८९ लाख २६ हजार ३८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८९ हजार ३०२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ६ लाख ६२ हजार ५२१ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

पत्र ‘प्रताप’ केवळ स्वार्थापोटी

अविनाश भोसलेंची ४० कोटींची संपत्ती सील

मुख्यमंत्री म्हणून नव्हे; बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली

फडणवीसांचा ई टेंडरिंगचा निर्णय ठाकरे सरकारने बदलला

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २८ कोटी ८७ लाख ६६ हजार २०१ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version