देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात ६२ हजार ४८० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ५८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या ७३ दिवसांनी ८ लाखांच्या खाली आली आहे.
India reports 62,480 new #COVID19 cases, 88,977 discharges & 1,587 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,97,62,793
Total discharges: 2,85,80,647
Death toll: 3,83,490
Active cases: 7,98,656 (below 8 lakh after 73 days)Vaccination: 26,89,60,399 pic.twitter.com/hhd9c2krzs
— ANI (@ANI) June 18, 2021
गेल्या २४ तासात भारतात ६२ हजार ४८० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ५८७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ८८ हजार ९७७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ वर गेला आहे. देशात २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ४९० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ७ लाख ९८ हजार ६५६ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
हे ही वाचा :
‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’
वाझेला शंभर कोटीचे टार्गेट, प्रदीप शर्माला कितीचे?
भारताच्या उत्तर आणि ईशान्य सीमा भागातील १२ महत्वाच्या रस्त्यांचे लोकार्पण
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.