संपुर्ण देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे भारताला अनेक देशांकडून सहाय्य केले जात आहे. ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अशा प्रकारची मोठी मदत भारताला प्राप्त झाली आहे. देशा बाहेरून येणाऱ्या या मदतीसोबतच भारतातील इस्रोदेखील देशवासीयांच्या मदतीला पुढे सरसावली आहे. इस्रोने तयार केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे अनेकांना नवा श्वास मिळणार आहे.
इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (व्हीएसएससी) तयार केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ‘श्वास’मुळे एका वेळी दोन रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. या ऑक्सिजन कॉन्सन्टन्ट्रेटरच्या सहाय्याने ९५ टक्के शुद्ध प्राणवायू मिळवता येणार आहे. त्यामुळे प्राणवायू पुरवठ्याची गरज असलेल्या अनेक रुग्णांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा:
सत्ताधारी शिवसेनेने महापालिकेच्या तिजोरीची सफाई केली
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती
मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता
देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण
श्वास उपकरणातून तब्बल १० लिटर प्रति मिनिट या गतीने दोन रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा केला जाऊ शकतो.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ६००वॅटचे हे उपकरण २२० व्होल्ट ५०Hz वर ०.५ -१० लिटर प्रतिमिनीट या वेगाने प्राणवायूचा पुरवठा करू शकते या उपकरणाला दोन निकास आहेत. एकातून ८२ टक्के शुद्धतेचा तर दुसऱ्यातून ९५ टक्के शुद्धतेचा प्राणवायू ५०-८० पास्कल दाबाने प्राप्त होऊ शकतो.
यासोबत श्वासला एक अलार्मदेखील देण्यात आला आहे. जर दाबात अथवा शुद्धेत फरक पडू लागला तर हा अलार्म वाजून तू इतरांना सुचित करू शकतो. या उपकरणाचे वजन ४२-४४ किलोग्रॅम आहे.
इस्रोने देशातील सर्व इच्छुक उत्पादकांना त्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. इस्रो या उपकरणाची सर्व तांत्रिक माहिती देण्यास तयार आहे.