नागपूरात कोविड रुग्ण फरार

नागपूरात कोविड रुग्ण फरार

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत असल्यामुळे येथे आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने कोरोनाला थोपवण्यासाठी डॉक्टर्स जीवाची बाजी लावत आहेत. मात्र, दुसरीकडे डॉक्टरांना उपचारासाठी सहकार्य मिळत नसल्याचेसुद्धा दिसत आहे. नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयातून एक कोरोनाबधित रुग्ण पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. सोमेश्वर नामदेवराव फुटाणे असे ५३ वर्षीय रुग्णाचे नाव आहे.

नागपूरच्या मेयो रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण नव्याने भरती होत आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आणि नव्याने भरती होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त अशी परिस्थिती येथे आहे. त्यामुळे जमेल त्या पद्धतीने डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत. मोठ्या मुश्किलीने रुग्णांना बेड भेटत आहेत. मात्र, ज्या रुग्णांना बेड भेटले आहेत, ते रुग्णसुद्धा निट उपचार घेत नसल्याचे दिसून येत आहे. याच मेयो रुग्णालयात उपचार सुरु असताना एक रुग्ण नाकावरचे ऑक्सिजन मास्क काढून बेपत्ता झाला आहे. सोमेश्वर नामदेवराव फुटाणे असे या रुग्णाचे नाव असून तो ५३ वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण काल (२१ एप्रिल) पासून बेपत्ता आहे. तो नेमका कोठे आहे, याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये.

हे ही वाचा:

फायझरची लस भारतात ‘ना नफा’ तत्वावर मिळणार

मृतदेह चुकीच्या घरी पाठवला, बीकेसी कोविड सेंटरचा धक्कादायक प्रकार

२४ एप्रिलपासून तरुणांच्या लसीकरणाची नोंदणी सुरु

मृतदेह दोन दिवस पडून, वाशीम मधील धक्कादायक घटना

या रुग्णावर मागील अनेक दिवसांपूसन नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर ठेवण्यात आले होते. मात्र, कालपासून तो ऑक्सिजन मास्क काढून आपल्या बेडवरून बेपत्ता झाला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारले असता रुग्णालयाने कानावर हात ठेवत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

Exit mobile version