कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये दोन हजाराने वाढ

कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये दोन हजाराने वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दोन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ६२ हजार २२४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात २ हजार ५४२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने दिलासाही आहे.

गेल्या २४ तासात भारतात ६२ हजार २२४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ५४२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात १ लाख ७ हजार ६२८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९६ लाख ३३ हजार १०५ वर गेला आहे. देशात २ कोटी ८३ लाख ८८ हजार १०० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ७९ हजार ५७३ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ८ लाख ६५ हजार ४३२ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा :

तीन दिवसात ४७ लाख लसी राज्यांना मिळणार

विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे

एरिक्सन पुन्हा उभा राहतोय! चाहत्यांचे मानले आभार

शिक्षकांनो १००% उपस्थिती हवी, पण शाळेत जायचे बस, टॅक्सीने!

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २६ कोटी १९ लाख ७२ हजार १४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात २८ लाख ४५८ जणांना लसीकरण करण्यात आले.

Exit mobile version