कोरोना वाढता वाढता वाढे

कोरोना वाढता वाढता वाढे

अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण. चिलेच्या संशोधन केंद्रातील ३६ शास्त्रज्ञांना बाधा.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. लोकांनी नियमांचे पालन न केल्यास नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावे लागतील असे वारंवार महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मंगळवारी महाराष्ट्रात २४ तासात २८६९९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. १३,१६५ रुग्ण हे बरे झाले आहेत तर गेल्या २४ तासांत १३२ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रात २,३०,६४१ इतके कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आजवर ५३,५८९ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात होणारी रुग्णवाढ ही अत्यंत चिंताजनक असून केंद्र सरकारतर्फेसुद्धा वेळोवेळी या विषयी महाराष्ट्र सरकारला सावध करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका

‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत

महाराष्ट्रात सातत्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले असून काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेतृत्वानेही अनेकदा लॉकडाऊन संदर्भातील इशारा दिला आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय सरकारसमोर आहे आणि लोकांनी नियम पाळले नाहीत तर नाईलाजास्तव तो पर्याय वापरावा लागेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे.

दरम्यान होळी आणि रंगपंचमी हे सण जवळ आले असून राजधानी मुंबईत कोविडच्या पार्श्वभूमीवर होळीवर बंदी घालण्यात आली आहे. गेले काही दिवस सातत्याने मुंबईची रुग्णसंख्या तीन हजार पेक्षा जस्तने वाढत आहे. मंगळवारी मुंबईत ३५१२ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

Exit mobile version