बेडसाठी आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा दुर्दैवी अंत

बेडसाठी आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा दुर्दैवी अंत

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका बड्या शहरांना बस्तान दिसतोय. पण अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. कुठे रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीयेत तर कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे. बुधवारी नाशिक मध्ये रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने एका रुग्णाने ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आंदोलन केले होते. पण त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

महाराष्ट्राचा सध्या कोरोनाच्या बाबतीत देशात पहिला क्रमांक लागतो. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. कोरोनाच्या कारणाने महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तर त्यातल्या काहींच्या नशिबी अतिशय दुर्दैवी मृत्यू येत आहे. बुधवारी नाशिकमध्ये एका कोरोना रुग्णाने अनोखे आंदोलन केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कोविड पॉजिटीव्ह आलेल्या या रुग्णाला रुणालयात बेड मिळत नव्हता. म्हणून हा रुग्ण चक्क ऑक्सिजन सिलेंडर लावलेल्या अवस्थेत थेट महापालिकेच्या आवारात पोहोचला. या रुग्णाला पाहून महापालिकेत एकच गोंधळ उडाला. अखेर महापालिकेच्या माध्यमातून या रुग्णाला बेड मिळवून दिला गेला. बिटको रुग्णालयात त्याला बेड मिळवून देण्यात आला. पण याच रुग्णालयात ऍडमिट असताना या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

मुंबईत दोन शिफ्टमध्ये लसीकरण

जीएसटीचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्न गोळा

गॅसमुळे गरम झालेल्या सामान्यांच्या खिशाला किंमत घसरणीचा थंडावा

सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा
दरम्यान या प्रकरणात दीपक डोके या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकृती ठीक नसताना कोरोना रुग्णाला आंदोलन करण्यास भाग पडल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला.

Exit mobile version