27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला

ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला

Google News Follow

Related

क्रीडा विश्वात खळबळ

जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धा ज्या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत, त्या गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. ऑलिम्पिक खरंतर गेल्यावर्षीच आयोजित होणं अपेक्षित होतं, पण कोरोनामुळे ऑलिम्पिक पुढे ढकललं होतं. या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडल्याचं आयोजकानी मान्य केलं आहे.

शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आलेल्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. पण आयोजकांनी यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. आता ज्या ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे त्या ठिकाणीच कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या एका खेळाडूला या गावातून बाहेर पाठवण्यात आलं असून टोकियोमध्ये त्याला एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

स्पर्धेवर असणारे कोरोनाचे सावट लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी एक स्पेशल प्लॅन तयार करण्यात येत असल्याचीही माहिती आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. गेल्या वर्षी होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोरोनामुळं पुढे ढकलली होती. आता ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार आहे. जगभरातील क्रीडापटूंचा समावेश असलेले ऑलिम्पिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजनांसह सज्ज आहोत असं गेल्या आठवड्यातच जपानच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा:

‘या’ उच्च न्यायालयाचे आजपासून थेट प्रक्षेपण

हस्तक्षेप कराल तर पक्षाचं नुकसान होईल

लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसैनिकाची हत्या

ऑलिम्पिक खेळांचं आयोजन २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होत आहे. या ऑलिम्पिकसाठी विदेशी प्रेक्षकांना येण्यासाठी आधीच बंदी घालण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी आणीबाणी लागू केल्यामुळं टोकियोमधील स्थानिक प्रेक्षकांना येण्यास देखील बंदी असणार आहे. त्यामुळं यंदाचं ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा