देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत १ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात २७ हजार २५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर काल २१९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
केरळमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०,२४० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४३ लाख ७५ हजार ४३१ वर पोहोचला आहे. तसचे ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या वाढून २२,५५१ झाली आहे. गेल्या २४ तासांत १ लाख १५ हजार ५७५ सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. तर संसर्गाचा दर १७.५१ टक्के इतका आहे.
हे ही वाचा:
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
मेडवेडेवने जिंकले ‘अमेरिकन ड्रीम’! जोकोविचचे ऐतिहासिक स्वप्न भंगले
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २४ लाख ४७ हजार ३२ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ४२ हजार ८७४ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ३ लाख ७४ हजार २६९ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ७४ कोटी ३८ लाख ३७ हजार ६४३ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.