गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेलं कोरोनाचं थैमान आज काहीसं निवळल्याचं चित्र आहे. पण चिंता मात्र कायम आहे. त्याचं कारण असं की राज्यात आज दिवसभरात ५२ हजार ३१२ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ५१ हजार ७५१ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात २५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या ५ लाख ६४ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में 51,751 नए #COVID19 मामले, 52,312 रिकवरी और 258 मौतें दर्ज़ की गई।
कुल मामले: 34,58,996
कुल रिकवरी: 28,34,473
मृत्यु: 58,245
सक्रिय मामले: 5,64,746 pic.twitter.com/6KS9eEQnWM— ANI_HindiNews (@AHindinews) April 12, 2021
नव्या आकडेवारीसह राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३४ लाख ५८ हजार ९९६ वर पोहोचली आहे. त्यातील २८ लाख ३४ हजार ४७३ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत ५८ हजार २४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या २४ तासांत ६ हजार ९०५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ९ हजार ३७ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ३६ जणांचा काही दीर्घ आजार होते. मृतांमध्ये ३० पुरुष आणि १३ महिला रुग्णांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
नितीन गडकरींच्या एका फोननंतर चार हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन हजर
अनिल देशमुखांना सीबीआयकडून समन्स
रेमडेसिवीर!! भाजपाने ‘आणून दाखवले’!!
नव्या आकडेवारीनुसार मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ८० टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३६ दिवसांवर येऊन ठेपलाय. ५ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा १.८९ टक्के झाला आहे.