कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत २ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात १ लाख ३४ हजार १५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात २ हजार ८८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात १ लाख ३२ हजार ३६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ७१३ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ७ हजार ७१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० वर गेला आहे. देशात २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ४० हजार ७०२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर १६ लाख ३५ हजार ९९३ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार, काका-पुतण्यांपुढे माना डोलावत

मीरा चोप्रा प्रमाणेच इतर २१ जणांचे नियमबाह्य लसीकरण

अपरिपक्वता की श्रेयवाद? फडणवीसांचा सवाल

बॉलीवूडमधील ४४ पेक्षा कमी वयोगटासाठी पालिकेने आधीच उघडली होती लशीची दारे

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २२ कोटी ४१ लाख ९ हजार ४४८ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version