भारत- श्रीलंका मालिकेलाही कोरोनाचा फटका

भारत- श्रीलंका मालिकेलाही कोरोनाचा फटका

नवे वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट संघ युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार खेळाडूंना घेऊन कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्व संघाने श्रीलंकेत पोहचून आपला विलगीकरणाचा कालावधी संपवून सराव सामने खेळण्यास ही सुरुवात केली. श्रीलंका दौऱ्यावर १३ जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार होता. पण कोरोनाच्या शिरकावामुळे आता श्रीलंका दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच सर्व भारतीय संघाला पुन्हा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

श्रीलंका क्रिकेट संघाच्या चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेचील सहा सामने जे १३ जुलैपासून सुरु होणार होते, ते चार दिवस पुढे ढकलून १७ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी हा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावरुन परतला यावेळी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि जी. टी. निरोशान यांच्यासह दोघांची कोरोना टेस्ट पॉजीटिव्ह आली. त्यामुळेच संपूर्ण श्रीलंका संघाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघालाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

रेल्वेमंत्र्यांनी कर्मचाऱ्याला मिठी का मारली?

‘या’ बँकेचं १००% खासगीकरण होणार

भावजयीवर ऍसिड हल्ला

तीन महिन्यांच्या मुलीला पुरणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक

त्यामुळे आता, पहिली वनडे १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा आणि तिसरा वनडेचे आयोजन १९ आणि २१ जुलैला आयोजन करण्यात आले आहे. तर टी२० सामान्यांची सुरुवात २१ जुलै ऐवजी २४ जुलैला खेळवण्यात येणार आहे.

Exit mobile version