23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषरुग्णवाढीत नोंदली गेली किंचित घट

रुग्णवाढीत नोंदली गेली किंचित घट

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर इतके दिवस वाढता होता. आज महाराष्ट्रातील जनतेला त्यातून थोडा दिलासा मिलाल्याचं दिसत आहे. आज रुग्णवाढ किंचीत कमी होऊन चार दिवसांनंतर प्रथमच ६० हजारच्या खाली राहिली आहे. त्याबरोबरच मुंबईत देखील किंचित दिलासा मिळाला असल्याचं दिसत आहे.

आज राज्यात दिवसभरात ५८,८९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेले चार दिवस सातत्याने महाराष्ट्रातील कोविड रुग्णवाढ ६० हजारच्या वर होत होती. आता ती काहीशी कमी झाली आहे.

हे ही वाचा:

कशी आली केंद्राची ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्राच्या मदतीला?

आता किराणा माल मिळणार ठराविक वेळेतच

आता लस ‘यौवनात’

‘नवाब मलिकांची हकालपट्टी करा’

त्याबरोबरच मुंबईकरांना देखील आज अल्प दिलासा मिलाला आहे. मुंबईत आज ७३८१ नवे रुग्ण आढळले तर बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ८५८३ होती. दुसरीकडे नागपूर मात्र कोरोनामुळे पुरतं हादरून गेलं आहे. एकाच दिवशी तब्बल ११३ मृत्यु कोरोनामुले झाले आहेत.

राज्यात कोरोनाने कहर मांडला आहे. त्यामुले ठाकरे सरकारने कडक निर्बंधांच्या नावाखाली टाळेबंदी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यातून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांनाच सूट देण्यात आलेली होती. मात्र आता कोविडचा वाढता प्रभाव पाहून महाराष्ट्रातील किराणा मालाची दुकाने देखील केवळ ४ तासांसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेतच खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मोदी सरकारकडून मात्र या पार्श्वभूमीवर एक चांगली खबर देण्यात आली आहे. आता १ मे पासून भारतातील १८ वर्षावरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. राज्य सरकारने कालच्या दिवसात टेस्टिंग कमी केली आहे त्यामुळेच रुग्णवाढीचा रेट हा कालच्या दिवसात कमी दिसला. सगळं कसं अगदी व्यवस्थित आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा