आयपीएलचा सामना कोरोनामुळे रद्द

आयपीएलचा सामना कोरोनामुळे रद्द

आजचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु सामना पुढे ढकलला

आयपीएलच्या १४ व्या पर्वावर कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. तथापि, कोलकाता आणि आयपीएलच्या अधिकृत निवेदनाची अद्यापपर्यंत कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाहीय. दरम्यान आज आयपीएलची कोणतही मॅच खेळवली जाणार नाही.

कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील आयपीएलचा सामना क्रमांक ३० अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार होती. परंतु कोलकात्याच्या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्याने हा सांमना पुढे ढकलण्यात आला आहे.

चक्रवर्ती नुकताच त्याच्या खांद्याच्या स्कॅनसाठी बायो बबलच्या बाहेर गेला होता. त्याच वेळी कोरोनाने त्याला गाठलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरुण चक्रवर्ती आणि वॉरियर वगळता केकेआरचे बाकीचे खेळाडू ठीक आहेत. त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

राष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

पोलीस महासंचालक संजय पांडेंचा परमबीर सिंगांची चौकशी करण्यास नकार

आयपीएल २०२१ सुरू झाल्यानंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजच्या रिपोर्टनुसार कोलकाता नाइट रायडर्सचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू आणि कर्मचारी आयसोलेटेड आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडलेल्या खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचे नावही आहे.

Exit mobile version