कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ७६ दिवसांनी हजाराच्या आत

कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ७६ दिवसांनी हजाराच्या आत

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात ४६ हजार १४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात ९७९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनाबळींचा आकडाही एक हजाराच्या खाली गेला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या २४ तासात भारतात ४६ हजार १४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९७९ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ५८ हजार ५७८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत आता भारताने अमेरिकेलाही मागे टाकत आघाडी घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ३२.३६ कोटी कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ३२.३३ कोटी डोस देण्यात आले आहेत.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २ लाख ७९ हजार ३३१ वर गेला आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९३ लाख ९ हजार ६०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ लाख ९६ हजार ७३० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ५ लाख ७२ हजार ९९४ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

पुदुचेरीला मिळाली पहिली महिला मंत्री

‘वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’…वडेट्टीवार शिवसेनेवर गुरगुरले

जगात भारी, दीपिका कुमारी!

पंतप्रधान मोदींनी घेतली तिरंदाज प्रवीण जाधवची दखल

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version