29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषकोविड घोटाळा प्रकरणात दंड केलेल्या कंत्राटदारालाच ३०० कोटींचं कंत्राट !

कोविड घोटाळा प्रकरणात दंड केलेल्या कंत्राटदारालाच ३०० कोटींचं कंत्राट !

भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यात दंड ठोठावण्यात आला, पुन्हा त्यालाच मिळालं कंत्राट

Google News Follow

Related

कोविड सेंटर घोटाळा (Covid Scam) प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनायाचे (ईडी) पथक करत आहे. ईडी पथकाला तपासात काही नवीन बाबी आढळून आल्या आहेत. भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यासाठी दंड ठोठावण्यात आलेल्या कंत्राटदारालाच कोविड दरम्यान ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी ३०० कोटी रुपये देण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

 

बुधवारी कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले. ईडीने जवळपास १० ठिकाणी छापे टाकले होते.ईडीने ज्या कंत्राटदारांवर छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील कंत्राटदार रोमीन छेडा यांचा समावेश आहे. छेडा यांना कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांनी मुंबई पालिकेकडून (BMC) मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे.महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) बुधवारी छापेमारी करण्यात आलेल्या सरकारी कंत्राटदारांची नावं समोर आली आहेत. रोमीन छेडा, रोमेल ग्रुपचे बिल्डर ज्यूड रोमेल आणि डॉमनिक रोमेल अशी कंत्राटदारांची नावं आहेत.

हे ही वाचा:

गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; पंचायत निवडणुकीत १८ ठार

आता गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही होणार ‘सायन्स सिटी’ 

पाकिस्तानातील नव्या पिढीतील महिलांना आवडते साडी…

मनपाच्या कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून या कंत्राटदारांच्या घरावर आणि कार्यालयांवर ईडीकडून बुधवारी छापेमारी करण्यात आली होती, त्याचबरोबर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान अशा एकूण १० ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. छापे टाकण्यात आलेली ठिकाणं ही कोविडच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेला सेवा पुरवणाऱ्या कंत्राटदारांशी संबंधित होती. छापेमारी दरम्यान आरोप असलेल्या कंत्राटदारांकडून कोट्यवधींची रोख रक्कम आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.ज्या कंत्राटदारांवर ईडीने छापे टाकले, त्यात घाटकोपर येथील रोमीन छेडा या कंत्राटदाराचा समावेश आहे, ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं.

त्यांना मनपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय आहे. छेडा याने यूपी-स्थित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत कंत्राटाचं काम करून घेतल्याचा संशय आहे आणि कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्यांना सुमारे ३०० कोटी रुपये दिले गेले होते, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं. निकृष्ट उपकरणं पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.या प्रकरणाचा तपास सुरू असताना कंत्राटदाराच्या फायलींवर मनपा अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली आणि त्याला भरघोस मोबदला दिला गेला, असंही सूत्रांनी सांगितलं. रोमीन छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहे, जी कंपनी यूपीतील अलाहाबाद येथे आहे. कोविड घोटाळ्याआधी भायखळा प्राणीसंग्रहालय पेंग्विन एन्क्लोजर घोटाळ्यात या संस्थेला दंड ठोठावण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा