चार दिवसानंतर देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

चार दिवसानंतर देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण. चिलेच्या संशोधन केंद्रातील ३६ शास्त्रज्ञांना बाधा.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल १२ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात २ लाख ८ हजार ९२१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढला आहे. कालच्या दिवसात ४ हजार १५७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येने वीस कोटींचा आकडा ओलांडला आहे.

गेल्या २४ तासात भारतात २ लाख ८ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार १५७ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ९५ हजार ९५५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ वर गेला आहे. देशात २ कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ११ हजार ३८८ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर २४ लाख ९५ हजार ५९१ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

५० टक्के लसीकरण झाल्यावरच मुंबईत अनलॉक

गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे

‘सुपर स्प्रेडर’ शेतकरी आंदोलनाला आज दिल्लीत सुरवात

व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २० कोटी ६ लाख ६२ हजार ४५६ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version