कोरोनाचा विस्फोट; राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारच्या जवळपास

कोरोनाचा विस्फोट; राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारच्या जवळपास

देशात आणि राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढायला सुरुवात केली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील शनिवार १ जानेवारीच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांचा आकडा १० हजाराच्या जवळ पोहोचला आहे. आज दिवभरात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आकडा ६ हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यात आज सात कोरोना रुग्णांचा मृत्यु झाल्याची नोंद आहे.

राज्यात आज ९ हजार १७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार ४४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नव्याने सहा ओमिक्रोन रुग्णांची नोंद झाली असून राज्यात ओमिक्रोन रुग्णांची एकूण संख्या ४६० वर पोहचली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिकेची चिंता जास्त वाढली आहे. कोरोना रुग्णांसोबतच ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊन लगेच लावण्यात येणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी १ जानेवारी रोजी स्पष्ट केले आहे. मात्र, कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईतून ३ कोटींचे ड्रग्ज जप्त

नवाब मालिकांचा जावई समीर खानच्या अडचणीत वाढ

‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’

लॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम?

मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट, बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून सरकार योग्य तो निर्णय घेईल असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version