कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट

कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट

मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ च्या २ लशी भारतीय कंपन्यांनी बनवल्यावरचे विधान.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे. सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर कालच्या आकडेवारीत काहीशी घट पाहायला मिळाली. त्यानंतर आजही कोरोना रुग्णांच्या संख्या कालच्या तुलनेट घटली आहे. कालच्या दिवसात तब्बल २ लाख ५७ हजार २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येतही घट झाली आहे. कालच्या दिवसात ४ हजार १९४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या २४ तासात भारतात २ लाख ५७ हजार २९९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार १९४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३ लाख ५७ हजार ६३० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९० वर गेला आहे. देशात २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २ लाख ९५ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर २९ लाख २३ हजार ४०० इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा

इंडियन व्हेरिअंट नावावरून केंद्र सरकारने समाजमाध्यमांना झापले

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा

शिवसेना कोकणी माणसाला संपवायला निघाली आहे

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या १९ कोटी ३३ लाख ७२ हजार ८१९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version