दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत गेले दहा दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता २१ मे ते ३१ मे या कालावधीत नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या ५० दिवसांतील हा २४ तासांच्या कालावधीतला निचांकी आकडा आहे. ताज्या आकडेवारीनुसार कालच्या दिवसात १ लाख ५२ हजार ७३४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार १२८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ८० लाख ४७ हजार ५३४ वर गेला आहे. देशात २ कोटी ५६ लाख ९२ हजार ३४२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख २९ हजार १०० रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर २० लाख २६ हजार ९२ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. कालच्या तुलनेत सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या ८८,४१६ ने कमी झाली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्राकडे बोट

सात वर्षे स्वच्छतेची… मोदी है तो मुमकिन है

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने तारांबळ

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २१ कोटी ३१ लाख ५४ हजार १२९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोनातून बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) – ९१.६०%. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट – ९.०४%. दैनिक पॉझिटिव्हिटी रेट – ९.०७%.

Exit mobile version