सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या केसेस लाखापेक्षा कमी

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या केसेस लाखापेक्षा कमी

देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी येताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. गेल्या २४ तासात देशात ९२ हजार ५९६ नवीन रुग्णांची भर पडली असून २२१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एकाच दिवसात देशातील एक लाख ६२ हजार ६६४ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, म्हणजे एकाच दिवसात ७२,२८७ सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी भारतात ८६,४९८ रुग्णांची भर पडली होती.

देशात गेल्या २७ दिवसांपासून सलग कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. देशातील रिकव्हरी रेट हा ९४ टक्के इतका आहे तर मृत्यू दर हा १.२१ टक्के इतका आहे. मंगळवारपर्यंत देशात २३ कोटी ९० लाख ५८ हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

राज्यात मंगळवारी गेल्या ७४ दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. काल राज्यात १० हजार ८९१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान आज २९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे.

हे ही वाचा:

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात

आला रे आला…मुंबईत मुसळधार

मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला

छे ! छे !! उद्धव ठाकरे अजिबात वाकले नाहीत…

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६९,०७,१८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,५२,८९१ (१५.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,५३,१४७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर ६,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,६७,९२७ सक्रिय रुग्ण आहेत.

Exit mobile version