भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ९४,०५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ६१४८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजचे, काल दिवसभरात ६३,४६३ ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी ९२,५९६ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
आज देशात सलग २८व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. ९ जूनपर्यंत देशभरात २४ कोटी २७ लाख २६ हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ३३ लाख ७९ हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत ३७ कोटी २१ लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात २० लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्क्यांहून अधिक आहे.
देशात कोरोनाचा मृत्यूदर १.२२ टक्के आहे. तर रिकव्हरी रेट ९४ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन ५ टक्क्यांच्या कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर एकूण बाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधित मृत्यू भारतात झाले आहेत.
राज्यात काल कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच काल कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल १० हजार ९८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल १६ हजार ३७९ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात १०२१९ रुग्णांची नोंद झाली होती.
हे ही वाचा:
आमचा लढा डॉक्टरांच्या विरोधात नसून औषधं माफियांच्या विरोधात
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आयपीएलचे उर्वरित सामने
मालाडच्या मालवणीत बिल्डींग कोसळून ११ जणांचा मृत्यू
मुंबई तुंबण्याला जबाबदार मुख्यमंत्री की मुंबई महापालिका?
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५५,९७,३०४ इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के झाला आहे. काल २६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल एकूण १,६१,८६४ सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यातील पाच महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात १० पैक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.