पुण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला दिसत आहे. काल एकाच दिवसात (बुधवारी) शहरात २५८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येचा आकडा पाहता महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज एका विशेष बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत नवे निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
काल दिवसभरात वाढलेल्या अडीच हजार रुग्णसंख्येनं प्रशासनानं धास्ती घेतली आहे. आज महापौर, शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी नवे निर्बंध काय असावेत, यावर चर्चा होणार आहे. महापौर, महापालिका आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा:
बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
पुणे शहरात आजपासून कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी ११ वाजता महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवे निर्बंध जाहीर करण्यात येणार आहे. तसंच अंमलबजावणीसाठीही कठोर पावलं उचलण्याचे आदेश महापौर देणार आहेत.
पुण्यात कोरोग्रस्तांचा आलेख दररोज वाढतच आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात २५८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील ५७३ रुग्णांचे अहवाल मागील काही दिवसांपासून प्रलंबित होते. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसत आहे. पुण्यात दररोज अडीच हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एक हजारांपेक्षांही कमी आहे. बुधवारी पुण्यात दिवसभरात २५८७ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात फक्त ७६९ जण कोरोनातून मुक्त झाले.