कोविड-१९ रुग्णसंख्येत पुन्हा घट, १.७३ लाख नवे रुग्ण

कोविड-१९ रुग्णसंख्येत पुन्हा घट, १.७३ लाख नवे रुग्ण

मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ च्या २ लशी भारतीय कंपन्यांनी बनवल्यावरचे विधान.

देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कमी येताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात एक लाख ७३ हजार नव्या रुग्णांची बर पडली असून ही आकडेवारी गेल्या ४५ दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी आहे. तसेच गेल्या २४ तासात दोन लाख ८४ हजार ६०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ३६१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी देशात १.८६ लाख कोरोना रुग्णांची भर पडली होती तर ३६६० रुग्णांनी आपला जीव गमावला होता. केंद्रीय मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत २० कोटी ८९ लाख ०२ हजार ४४५ कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्य़ात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्यानं शिथिलता आणली तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २० दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे.

राज्यात शुक्रवारी २०,७४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ३१ हजार ६७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९३.२४ टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज ४२४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जातंय.

हे ही वाचा:

ओबीसी आरक्षणाला दणका, ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

उल्हासनगरात स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला हवेत महागातले कॉन्सन्ट्रेटर

ऑक्सिजन एक्सप्रेस सुसाट

राज्यात आजपर्यंत एकूण ५३,०७,८७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४३,५०,१८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,९२,९२० (१६.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,५४,९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Exit mobile version