सध्या सगळं जग ज्या एका विषाणुचा सामना करत आहे, तो SARS-CoV-2 हा विषाणु चीनी सैन्याच्या प्रयोगशाळेत तयार झाला असून, जगाविरूद्ध अस्त्र म्हणून वापरलं जात असल्या बद्दलच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यासंबंधीचा अहवाल देखील काही माध्यमांनी मिळाला असल्याचा दावा केला होता. या संदर्भात इंडिया टुडेचा पत्रकार गौरव सावंत यांनी चीनच्या विषाणुतज्ज्ञ डॉ. ले- मेंग यान यांची मुलाखत घेतली.
डॉ. मेंग यांनी बोलताना सांगितले, की अशा तऱ्हेचा अहवाल चीनच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे, की चीनला हा विषाणु एका अस्त्राच्या स्वरुपात वापरायचा होता. त्याबरोबरच त्यांनी चीनच्या अपारंपारिक जैविक अस्त्र निर्माण करण्याच्या विचारांना देखील दुजोरा दिला.
हे ही वाचा:
सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट
कोविशिल्ड लसीमुळे मृत्युचा धोका ८० टक्क्यांनी कमी
राज्यातील म्युकोरमायकॉसिसचा धोका वाढला
राजभवनाच्या लॉनवरून मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे टोलवणार
डॉ. मेंग यांनी सांगितले, की त्यांनी मागील जानेवारी पासून याबाबत अज्ञात नावाने यु-ट्युबवरून लोकांना याबाबत माहिती द्यायला सुरूवात केली. हा विषाणू चीनी सैन्याच्या प्रयोगशाळेत निर्माण झाला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. त्याबरोबरच चीनी सरकारला देखील याची पूर्ण कल्पना असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या वर्षी वुहानमध्ये झालेला उद्रेक ही चाचणी असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. सैन्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे अपारंपारिक जैविक अस्त्र असल्याने ते अधिक प्राणघातक असता कामा नये असे सांगितले होते. याचा वापर शत्रुची समाजव्यवस्था, आरोग्यव्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी करायचा होता. त्याबरोबरच जगाला सातत्याने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती सातत्याने दिली गेली.
त्याशिवाय सैनिकी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पुस्तकात देखील याचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्या पुस्तकात ही केवळ सुरूवात असल्याचे देखील म्हटले होते.
डॉ मेंग यांच्या सविस्तर मुलाखतीतून कोविड-१९ चीनचा डाव होता, आणि यात संपूर्ण जगाची देखील दिशाभूल केली गेली असल्याचा संशय बळावत जातो.