कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट

मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ च्या २ लशी भारतीय कंपन्यांनी बनवल्यावरचे विधान.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात ५१ हजार ६६७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ३२९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात ५१ हजार ६६७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३२९ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ६४ हजार ५२७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी १ लाख ३४ हजार ४४५ वर गेला आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ६ लाख १२ हजार ८६८ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

‘लुटा आणि वाटून खा’ हा महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे

ओबीसी आरक्षणाचा ठाकरे सरकारने मुडदा पाडला

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ३० कोटी ७९ लाख ४८ हजार ७४४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version