कोवॅक्सिनवर लवकरच जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेची मोहोर?

कोवॅक्सिनवर लवकरच जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेची मोहोर?

संपूर्ण जग सध्या कोविड महामारीचा सामना करत आहे. त्यावर लसीकरण हा रामबाण उपाय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक देशांत लसीकरण मोहिम चालू आहे. भारतातील लसीकरण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आधारे चालू आहे. यापैकी कोवॅक्सिन लसीला सप्टेंबर अखेरपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोवॅक्सिन ही भारत बायोटेक निर्मित संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. या लसीला अद्यापही पश्चिमी देशांकडून मान्यता मिळाली नाही. जागतिक आरोग्य संघटनेतील काही अधिकाऱ्यांच्या मते कोवॅक्सिन लसीची संघटनेकडून चालू असलेली चाचणी आता बऱ्याच पुढच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या लसीला मान्यता आपात्कालिन वापरासाठी मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून

अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

डॉ. मारिएन्जेला सिमाओ या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख व्यवस्थाकांनी दिलेल्या माहितीनुसार या संघटनेकडून कोवॅक्सिनची चाचणी घेतली जात आहे. भारत बायोटेकच्या या लसीची चाचणी आता पुढच्या टप्प्यात आली आहे आणि अधिकाऱ्यांना या लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची आशा वाटत आहे.

सिमाओ यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक आरोग्य संघटना यापूर्वीच मान्यता दिलेल्या इतर काही लसींच्या वेगळ्या अवतारांचा देखील विचार करत आहे, ज्यामध्ये सिनोफार्मच्या लसीचा देखील समावेश आहे. त्यांनी असे देखील सांगितले की, सानोफी पास्चर आणि नोवावॅक्स लसींचा देखील विचार केला जात आहे.

Exit mobile version