भारत सरकारने भारतात निर्माण करण्यात आलेल्या कोवॅक्सिन लसीला जागतिक स्तरावर मान्यता मिळावी यासाठी चंग बांधला आहे. भारत सरकार विविध उपायांद्वारे कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामध्ये आता आणखी एका देशात कोवॅक्सिन लसीची चाचणी घेतली जाणार आहे.
भारतामध्ये कोवॅक्सिन लसीचा वापर केला जात आहे. परंतु अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला मान्यता दिली नसल्यामुळे ही लस घेतलेल्यांना पर्यटनात अडचणी येत आहेत. भारत सरकारकडून या लसीला देखील मान्यता मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कोवॅक्सिनची चाचणी बांगलादेशात देखील केली जाणार आहे.
भारत सरकारने या चाचणीसाठीचा अर्थपुरवठा सुरक्षित केला असल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने बायोटेक्नॉलॉजी विभागाचे आणि भारत बायोटेक कंपनीचे काही प्रतिनिधी या संदर्भात चर्चा करण्यासाठी ढाका येथे पाठवले होते.
या शिवाय भारत सरकाकडून इतर देशांच्या औषध नियंत्रक प्रशासकांनी देखील कोवॅक्सिनला मान्यता द्यावी यासाठी प्रयत्नशील आहे. बांगलादेश मेडिकल रिसर्च काऊन्सिल (बीएमआरसी) कडून १८ जुलै रोजीच या लसीच्या चाचणीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पूजा चव्हाण प्रकरणात मिळाला मोठा पुरावा! संजय राठोडांच्या अडचणीत वाढ?
…आणि दोघांनीही विभागून घेतले सुवर्णपदक
…म्हणून साजरा झाला ‘मुस्लिम महिला हक्क दिन’
कोरेगाव भीमा खटल्यावरून न्यायमुर्ती शिंदेंना हटवण्याची मागणी! वाचा काय आहे कारण
भारत बायोटेक आणि आयसीएमआरकडून एकत्रितपणे तयार करण्यात आलेली ही लस भारतातील लसीकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या तीनपैकी एक लस आहे. सध्या भारतातील लसीकरण कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक लसींच्या सहाय्याने चालू आहे.