कोवॅक्सिनला एका आठवड्यात डब्ल्यूएचओची संमती

कोवॅक्सिनला एका आठवड्यात डब्ल्यूएचओची संमती

जागतिक आरोग्य संघटना या आठवड्यात भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लस कोवॅक्सिनला मंजुरी देऊ शकते. कोवॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून इमर्जन्सी वापरासाठीच्या यादीत स्थान मिळालं नाही.
भारत बायोटेकने चाचणीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे आणि डेटा जुलै महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेला उपलब्ध करून दिला होता. डब्ल्यूएचओ या आठवड्यात भारत बायोटेकच्या लसीला परवानगी देऊ शकते.

आपत्कालीन वापरासाठी तज्ञांकडून या लसीचे पुनरावलोकन केले जात होते. डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी जुलैमध्ये सांगितले की एक तज्ज्ञ समिती डोजियरचा आढावा घेत आहे.
फायझर, ऍस्ट्राझेनेका, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, सिनोवॅक आणि सिनोफार्म यांना डब्ल्यूएचओने आपत्कालीन वापर यादीत जागा दिली आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन वापराच्या यादीत कोवॅक्सिन लसीला जागा मिळावी अशी मागणी भारत बायोटेकने केली आहे. याबाबत डब्ल्यूएचओने आधीच कंपनीसोबत चर्चा केली आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस कालवश

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७वे मुख्यमंत्री पदभार स्वीकारला

मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकने मेड इन इंडिया कोविड -१९ लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी डेटा डीसीजीआयला सादर केला आहे. याआधी, डीसीजीआयने फेज १ आणि फेज २ ट्रायल डेटाच्या आधारे जानेवारी महिन्यात भारतात कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. ही चाचणी भारतात २५ ठिकाणी करण्यात आली.

Exit mobile version