कोविशील्डनंतर कोवॅक्सीनचीही किंमत जाहीर

कोविशील्डनंतर कोवॅक्सीनचीही किंमत जाहीर

भारत बायोटेकने संपूर्ण स्वदेशी लस कोवॅक्सीन लसीच्या प्रति डोसच्या किमतीची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं की, राज्य सरकारसाठी प्रति डोस ६०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी १,२०० रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितलं की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोवॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे.

यापूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, “कोविड-19 लस ‘कोविशील्ड’ ची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रति डोस असणार आहे.

कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “१५० रुपये प्रति डोसचा सध्याचा करार संपल्यानंतर केंद्र सरकारसाठीही लसीच्या प्रति डोसची किंमत ४०० रुपये प्रति लीटर असणार आहे. सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात सांगितलं की, “भारत सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी ५० टक्के आणि उरलेला ५० टक्के साठी राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे.”

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, सरकारच्या निर्देशांनुसार ‘कोविशील्ड’ची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रति डोस आणि खाजगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रति डोस असणार आहे.

हे ही वाचा:

कठीण समय येता रशिया कामास येतो?

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक

धर्मांतरासाठी ५०,००० रुपयांची लालूच, नकार दिल्यावर मारहाण

केंद्राने निधी दिला, तरीही ठाकरे सरकारने उभारले नाहीत ऑक्सिजन प्लॅन्ट्स

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आज कोविड १९ प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.

Exit mobile version