31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषकोवॅक्सिन अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी

कोवॅक्सिन अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी

Google News Follow

Related

अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातून दिलासादायक बाबी समोर आल्या आहेत. या संशोधनातून भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या सहयोगानं भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन लस ही कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही रुपांवर प्रभावी ठरत असल्याचं निष्पन्न झालं आहे. अमेरिकेच्याच एफडीए म्हणजेच फेडरल ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने आजवर कोवॅक्सिनला मान्यता दिलेली नाही. तज्ज्ञांच्या मते हा लस निर्मिती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दबाव तंत्राचा भाग असू शकते.

यासंदर्भात बोलताना एनआयएचनं सांगितलं की, ज्या लोकांनी कोवॅक्सिन लसीचा डोस घेतला होता, त्यांच्या रक्त्याच्या सॅम्पल्सवर दोन संशोधनं करण्यात आली होती. दोन्ही संशोधनांमधून निष्पन्न झालं की, या लसीमुळे शरीरात अधिक अँटीबॉडी तयार होतात. ज्या बी.१.१७ अल्फा आणि बी.१.६१७ डेल्टा व्हेरियंटला प्रभावीपणे निष्क्रीय करते. मिळालेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिनमध्ये कोरोना व्हायरसच्या एका रुपाचा समावेश करण्यात आला आहे. जो व्हायरस विरोधात अँटिबॉडी तयार करण्यासाठी प्रतिरक्षा प्रणाली उत्तेजित करतो.

एनआयएचनं दिलेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची निरिक्षण सांगतात की, ही लस सुरक्षित आहे आणि कोरोनावर प्रभावीदेखील आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा सुरक्षा डाा या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होईल. तसेच नेशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इंफेक्शियस डिजीजचे निर्देशक अँथनी एच फाउची यांनी बोलताना सांगितलं की, “एक वैश्विक महामारी संपवण्यासाठी वैश्विक प्रक्रियेची आवश्यकता आहे.”

हे ही वाचा:

महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?

निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी

शिवसेनेला ‘व्हीप’ची गरज का पडली?

एनआयएचनं दिलेल्या माहितीनुसार, एनआयएआयडी एडजुवेंट प्रोग्रामने २००९ पासून वीरोवॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डेविड यांच्या शोधाचं समर्थन केलं आहे.

एनआयएचने सांगितलं आहे की, कंपनीने एलहायड्रॉक्सिकिम-II चं व्यापक सुरक्षा अध्ययन केलं आणि उत्पादन वाढवण्याच्या जटिल प्रक्रियेला सुरवात केली आहे. भारत बायोटेकला २०२१ च्या शेवटापर्यंत कोवॅक्सिनचे ७० कोटी डोसचं उत्पादन करण्याची आशा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा