आज झालेल्या जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) तांत्रिक सल्लागार गटाने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनसाठी आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पॅनेलने गेल्या आठवड्यात हैदराबादस्थित भारत बायोटेककडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागितले होते.
तांत्रिक सल्लागार गटाने २६ ऑक्टोबर रोजी बैठक घेतली आणि भारत बायोटेककडून अतिरिक्त तपशील मागितले. कोवॅक्सिनने कोविड-१९ विरूद्ध ७७.८ टक्के परिणामकारकता आणि नवीन डेल्टा प्रकाराविरूद्ध ६५.२ टक्के संरक्षण देत असल्याचे प्रदर्शित केले आहे. जूनमध्ये, कंपनीने सांगितले की त्यांनी फेज ३ चाचण्यांमधून कोवॅक्सिनच्या परिणामकारकतेचे अंतिम विश्लेषण केले.
गेल्या आठवड्यात जी२० शिखर परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांना जिनिव्हा येथे जी२० शिखर परिषदेच्या बाजूला झालेल्या बैठकीत त्वरीत मंजुरी देण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले की, डब्ल्यूएचओने भारतीय लसींना लवकरात लवकर मान्यता देणे आवश्यक आहे. असे त्यांनी ठामपणे सांगितले कारण भारत महामारीविरूद्धच्या लढाईत जगाला मदत करण्यासाठी पुढील वर्षी ५ अब्जहून अधिक कोविड लसीचे डोस तयार करण्यास तयार आहे.
हे ही वाचा:
शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?
घरोघरी जाऊन लसीकरण करा, मोदींचे राज्यांना आदेश
गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश
काय आहे ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड’?
भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि ऍस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्या दोन लसी आहेत. डब्ल्यूएचओने आतापर्यंत फायझर, ऍस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना आणि सायनोफार्मच्या कोविड-१९ लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.