कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कोवॅक्सिन प्रभावी

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कोवॅक्सिन प्रभावी

भारत बायोटेकने निर्माण केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन ही लस कोविडच्या सर्व उत्परिवर्ताविरूद्ध प्रभावी असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. आयसीएमआरच्या सांगण्यानुसार ही लस सार्स-कोव्ह-२ (SARS-CoV-2) च्या दुहेरी उत्परिवर्ताविरूद्ध देखील प्रभावी ठरली आहे.

हे ही वाचा:

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

संध्या दोशींवर गुन्हा दाखल करा! भाजपाची मागणी

राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिवीरचा काळाबाजार

महापालिकेचे रुग्णालय शिवसेनेची खाजगी मालमत्ता आहे का?

आयसीएमआरने देखील याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे.

आयसीएमआर- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) या दोन्ही संस्थांना संयुक्तपणे सार्स-कोव्ह-२च्या विविध उत्परिवर्तनाचे नमुने स्वतंत्रपणे वाढवणे जमले होते. यात युके, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेच्या उत्परिवर्तीत विषाणुचा देखील समावेश होता.

कोवॅक्सिन ही लस यापूर्वीच विषाणुच्या युके आणि ब्राझिल प्रकाराविरुद्ध प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते.

आयसीएमआर आणि एनआयव्हीला दुहेरी उत्परिवर्तीत विषाणु वेगळा मिळवण्यात नुकतेच यश आले. दुहेरी परिवर्तन झालेला बी.१.६१७ सार्स-कोव्ह-२ हा विषाणु सध्या भारतातील काही भागात सध्या आढळत आहे. कोवॅक्सिन ही लस या विषाणुच्या विरूद्ध देखील प्रभावी असल्याचे नुकतेच कळले आहे.

भारताच्या लसीकरण कार्यक्रमात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन जागतील सर्वात मोठ्या लस उत्पादक सीरम इन्स्टिट्युटकडून केले जात आहे. भारताने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध वयोगटांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. आता १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना लस देण्यात येणार आहे.

Exit mobile version