दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांनाही आता मिळणार कोवॅक्सिन

दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांनाही आता मिळणार कोवॅक्सिन

दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिनची कोविड -१९ लस देण्याची शिफारस मंगळवारी एका तज्ज्ञ समितीने केली. “भारत बायोटेकने कोवॅक्सिनसाठी दोन ते अठरा वयोगटातील क्लिनिकल चाचण्यांमधील डेटा सीडीएससीओ (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन) ला सादर केला आहे. विषय तज्ज्ञ समितीने डेटाची कसून समीक्षा केली आहे. त्यांनी डेटाबद्दल सकारात्मक शिफारसी दिल्या आहेत.” हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीने सांगितले.

“हे दोन ते अठरा वयोगटातील कोविड -१९ लसींसाठी जगभरातील पहिल्या मंजुरींपैकी एक आहे. आम्ही आता उत्पादन सुरू होण्यापूर्वी आणि मुलांसाठी कोवॅक्सिनची बाजारपेठ उपलब्ध होण्यापूर्वी पुढील नियामक मंजुरीची वाट पाहत आहोत.” असे कंपनीने म्हटले आहे. ती अंतिम मंजुरी औपचारिकता म्हणून पाहिले जाते, जी भारताच्या औषध नियंत्रक जनरलद्वारे दिली जाईल.

जेव्हा ती मंजुरी येईल, कोवॅक्सिन ही भारतातील मुलांसाठी वापरण्यासाठी मंजूर केलेली दुसरी लस असेल; ऑगस्टमध्ये झायडस कॅडिलाच्या तीन-डोस डीएनए लस प्रौढ आणि बारा वर्षांवरील मुलांवर वापरण्याची परवानगी मिळाली होती. मुलांसाठी तिसरी संभाव्य लस सीरम इन्स्टिट्यूटची नोव्हावॅक्स आहे, ज्यासाठी डीसीजीआयने गेल्या महिन्यात सात ते अकरा वर्षांच्या मुलांसाठी चाचण्या मंजूर केल्या आहेत. चौथी म्हणजे बायोलॉजिकल ई कॉर्बेव्हॅक्स, जी पाच वर्षांवरील मुलांवर प्रगत चाचण्या घेण्यास मंजूर झाली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

गेल्या आठवड्यात उत्पादक भारत बायोटेकने सांगितले की त्यांनी मुलांवर लसीच्या चाचण्यांचा डेटा सादर केला आहे. मुलांवर चाचणी केलेली कोवाक्सिन लस प्रौढांवर वापरल्याप्रमाणेच आहे. परंतु तरुण लसवंतांवर सुरक्षा आणि प्रभावीपणाची हमी देण्यासाठी स्वतंत्र चाचण्या आवश्यक होत्या. या चाचण्यांवरील डेटा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. परंतु देशभरातील हजारपेक्षा जास्त मुलांवर चाचण्या करण्यात आल्या. तथापि, पॅनेलने नोंदवले की मुलांवर चाचणी प्रौढांप्रमाणेच प्रभावीपणाचा दर दर्शवते.

Exit mobile version