कोरोना प्रतिबंधक लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार

कोरोना प्रतिबंधक लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार

कोरोना प्रतिबंधित लसीविषयी महत्त्वाची बातमी असून या महामारीच्या लढ्यात भारताने मोठे पाऊल टाकले आहे. कोरोना प्रतिबंधित लस आता लवकरच औषधांच्या दुकानात (मेडिकल स्टोअर्स) मिळणार आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लवकरच रुग्णालयांबरोबरच आता औषधांच्या दुकानात कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसी मिळणार आहेत. या लसींची खुल्या बाजारात विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या विशेष समितीने केली आहे.

बुधवार, १९ जानेवारी रोजी केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञांची विशेष समितीची बैठक झाली. या बैठकीत समितीने कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी खुल्या बाजारात विकण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताचा कोरोना लढा आणखी भक्कम होणार आहे. केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या या लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे.

आता लवकरच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लसी रुग्णालये आणि औषधांच्या दुकानात उपलब्ध करून देता येतील. सरकारच्या कोवीन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्सना लस विक्रीची मुभा असणार आहे.

हे ही वाचा:

मुलायम परिवारातही आता भा’जप’

लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला

गोव्यात काँग्रेसला महाविकास आघाडी झेपली नाही!

कोरोना लसींच्या नियमित मार्केटिंगसाठी मान्यता मिळवण्याच्या हेतूने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी देशाच्या औषध महानियंत्रकांकडे (DCGI) अर्ज केले होते. त्यांच्या अर्जाची दखल घेताना तज्ज्ञांच्या विशेष समितीने लसींच्या चाचणीसंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर खुल्या बाजारातील लसींच्या विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. समितीने केलेल्या शिफारसीला अनुसरून आता सरकारकडून औपचारिक अंतिम मंजुरीची घोषणा केली जाण्याची प्रतीक्षा आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना देशभरात आपली वितरण व्यवस्था तयारी करावी लागणार आहे. त्यानंतर या कंपन्या आपल्या लसी सर्व रुग्णालये आणि औषधांच्या दुकानात पोहोचवू शकणार आहेत.

Exit mobile version