मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना कॅट कडे जाण्याचा सल्ला न्यायालयाने दिला आहे. सिंह यांचे प्रकरण सेवेशी निगडित असल्याचे भासत असल्यामुळे न्यायालयाने हा सल्ला दिला. तसेच त्यांच्या याचिकेच्या सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांची चौकशी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या दोन आदेशांना आव्हान देणारी याचिका सिंह यांनी न्यायालयात दाखल केली आहे. परमबीर सिंह ह्यांच्या या याचिकेवर मंगळवार, ४ मे रोजी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणात ९ जून ही पुढील तारीख दिली आहे. सिंह यांचे वकील सनी पुनमीया यांनी कोर्टाला पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. जेष्ठ विधिज्ञ मुकुल रोहोतगी आणि आबाद पोंडा हे परमबीर यांची बाजू मांडणार होते. पण ते दोघेही उपस्थित नसल्यामुळे पुढील तारखेची मागणी पुनमीया यांनी केली. परमबीर यांच्या याचिकेत घाई करण्यासारखे काहीच नाही असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणीसाठी ९ जुनची तारीख दिली.
हे ही वाचा:
बंगालच्या सत्ताधाऱ्यांचे रक्तरंजित राजकारण भाजपा सहन करणार नाही
बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण
बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा
पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध
पण याचवेळी न्यायालयाने सिंह यांना ‘कॅट’ अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. प्रथम दर्शनी परमबीर यांचे प्रकरण सेवेशी समबंधित असल्याचे भासते. त्यामुळे प्रथम त्यांनी ‘कॅट’ मध्ये जावे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.