सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंजली आयुर्वेदने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन माफी मागितली असली तरी आता न्यायालयाने त्या जाहिरातिच्या आकारावरून जाब विचारला आहे. उत्पादनाच्या जाहिराती ज्या आकारात दिल्या त्या आकारात माफीच्या जाहिराती दिल्या का ? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. पतंजलीकडून ६७ वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रकाशित करण्यात आला आहे.
पतंजली आयुर्वेदने या जाहिरातींसाठी १० लाख रुपये खर्च केला आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या एक आठवड्यानंतर याबद्दल विचारले होते. जाहिरातीचा आकार हा तुमच्या जाहिरातींइतकाच आहे का? असा प्रश्न न्यायमूर्ती कोहली यांनी विचारला. यावेळी बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण न्यायालयात उपस्थित होते.
हेही वाचा..
सलमान खान गोळीबार प्रकरणातील दुसरी पिस्तुल सापडली !
मतदारांचा आशीर्वाद मोदीजींपर्यंत पोहोचवा
गडचिरोली: नक्षलवाद्यांच्या समर्थकास पोलिसांकडून अटक!
वधूपक्षाकडून वधूचेच अपहरण, पाहुण्यांवर मिरची पावडर फेकली!
न्यायालयाने पतंजलीला जाहिराती एकत्र करून खंडपीठासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आम्हाला वास्तवात हा आकार बघायचा आहे. अशा जाहिराती मायक्रोस्कोपद्वारे बघायला लागू नयेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि खेद व्यक्त करावा, असे निर्देश दिले होते.
न्यायालयाने नमूद केले की इतर FMCG देखील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करत आहेत. न्यायमूर्ती कोहली म्हणाले, याचा विशेषतः लहान मुले, शाळेत जाणारी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी ठेवली आहे. भारतीय मेडिकल असोसिएशन (IMA) ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पतंजलीने आधुनिक वैद्यक पद्धतींविरोधात मोहीम चालवल्याचा आरोप केला आहे.