पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा देणाऱ्या मध्य प्रदेशातील फैझल खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वेगळीच शिक्षा सुनावली आहे. त्याच्या या घोषणाबाजीनंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्याविषयीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला पण एक आगळीवेगळी शिक्षाही सुनावली.
भोपाळमध्ये या फैझल खानने पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा देत देशाचा अपमान केला. त्याविरोधात त्याला अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश कुमार पालिवाल यांनी जामीन मंजूर करताना शिक्षा सुनावली की, फैझल खानने भोपाळमधील मिसरोड पोलिस ठाण्यात पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी जायचे आणि तिथे फडकत असलेल्या तिरंगा ध्वजाला सलाम करायचा तसेच भारत माता की जय ही घोषणा २१ वेळा द्यायची. यासाठी त्याने पोलिसा ठाण्यात सकाळी १२ ते रात्री १२ या दरम्यान हजेरी लावायची आहे आणि दिलेली शिक्षा पूर्ण करायची आहे.
हे ही वाचा:
विधानसभेसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज!
विजेचा शॉक, नखे काढली, अन गोळ्यांनी छातीची चाळण केली!
४८ तासात १३ विमान कंपन्यांना धमक्या !
नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!
न्यायालयाने भोपाळच्या पोलिस आयुक्तांना अशा सूचनाही दिल्या आहेत की, त्यांनी या फैझल खानला जी शिक्षा देण्यात आली आहे, त्याची तो पूर्तता करतो आहे की नाही, यावर लक्ष ठेवावे. फैझल खानला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा तो मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेला. आपल्याविरोधा खोटा खटला दाखल करण्यात आल्याचे त्याने सांगितले. पण या खटल्याच्या सुनावणीत फैझलच्या वकिलांनी हे मान्य केले की, फैझलने हा देशविरोधी घोषणा दिलेल्या आहेत. पण त्याला जामिनावर सोडावे आणि ते करताना त्याला कठोर शासनही करावे.
पण प्रतिवादीतर्फे या जामिनाला विरोध करण्यात आला. फैझल खान हा गुन्हा करण्यात वाकबगार असून त्याच्याविरोधात १४ गुन्हे दाखल आहेत. ज्या देशात तो जन्मला त्याच देशाच्या विरोधात तो घोषणा देतो. वकिलांनी अशी मागणीही केली की, जर त्याला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्याने ज्या देशाच्या झिंदाबादच्या घोषणा दिल्यात त्या देशात त्याने राहावे. त्यानंतर न्यायाधीशांनी सदर शिक्षा या फैझलला सुनावली.