इंदुरीकर महाराज यांच्या विरोधातील खटला रद्द

इंदुरीकर महाराज यांच्या विरोधातील खटला रद्द

आपल्या हटके किर्तनांसाठी प्रसिद्ध असणारे किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात दिलेल्या एका संदर्भामुळे वादंग उठला होता. त्या वक्तव्याचा आधार घेत इंदुरीकर महाराजांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. पण कोर्टाने प्रकरणात निकाल देत इंदुरीकर महाराजांविरोधातील खटला रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त न्यायालयाने यासंबंधीचा आदेश दिला आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे असे लोकप्रिय किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. “सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते आणि अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी, आणि खानदान मातीत घालणारी होते” असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती.

हे ही वाचा:

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी

संजय राऊत यांची चौकाशी करा

११ लोकांचा मृत्यू होऊन सुद्धा सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम- अतुल भातखळकर

या वक्तव्याविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि इतर काही सामाजिक संघटनांनी कोर्टात धाव घेतली. संगमनेर न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. इंदुरीकर महाराजांनी लिंगभेदाला प्रोत्साहन दिले असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. इंदुरीकर यांनी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात अपील केले होते. यात इंदुरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत कोर्टाने त्यांच्या विरोधातील खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version