29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषदिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी पतंजलीचा माफीनामा न्यायालयाने केला मान्य

दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी पतंजलीचा माफीनामा न्यायालयाने केला मान्य

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांचा माफीनामा स्वीकारला

Google News Follow

Related

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी दिलासा दिला आहे. बाबा रामदेव, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांनी मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने अखेर मान्य केली आहे. तसेच न्यायालयाने मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी माफीनामा मान्य करत हे अवमान प्रकरणही बंद केले आहे.

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी बाबा रामदेव, त्यांचे सहकारी बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना जारी करण्यात आलेल्या अवमान नोटीसवरील आदेश सर्वोच्च न्यायालयाने १४ मे रोजी राखून ठेवला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) पतंजलीवर कोविड-१९ लसीकरणाबाबत चुकीची मोहीम चालवल्याचा आरोप केला होता. त्यावर न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेत पतंजलीच्या भ्रामक जाहिरातीमुळे ऍलोपॅथी औषधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले होते. यमूर्ती हिमा कोहली आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय दिला आहे.

हे ही वाचा:

प्रमोद भगत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकला मुकणार; १८ महिन्यांसाठी निलंबित

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नऊ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली

… म्हणून मुनव्वर फारुकीने मराठी माणसाची मागितली माफी!

प्रकरण काय?

कोविडच्या काळात २०२१ मध्ये पतंजलीने ‘कोरोनिल’ नावाचे औषध बाजारात आणले होते. यावेळी बाबा रामदेव यांनी या औषधाबद्दल कोविड-१९ वरील उपचार असा दावा केला होता. पतंजलीने असाही दावा केला होता की, ‘कोरोनिल’कडे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमाणपत्र आहे, परंतु इंडियन मेडिकल असोसिएशनने हे दावे हाणून पाडले. दरम्यान, बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी ऍलोपॅथी संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले. हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. दरम्यान न्यायालयानेही बाबा रामदेव आणि पतंजलीला फटकारले आणि अखेर त्यांचा माफीनामा मान्य केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा