पश्चिम बंगालमधील एक जोडप्याने कोरोनाकाळात त्यांच्या लग्नाला ४५० लोकांना आमंत्रित केले आहे. परंतु, कोरोनाचे कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता. हे कसे शक्य आहे? तर त्या जोडप्याला आपल्या नातेवाइकांसमवेत कोरोनाकाळात विवाह करता यावा, यासाठी त्यांनी नामी शक्कल लढवली आहे. त्या जोडपण्याने गूगलमीटद्वारे पाहुण्यांना लग्नाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
संदिपन सरकार आणि अदिती दास असं या जोडप्याचे नाव असून, येत्या २४ जानेवारीला त्यांचा विवाह आहे. ज्यात शंभर पाहूणांसमवेत, ३५० पाहुण्यांना गूगलमीट वरून लग्नाला उपस्थित राहणार आहेत. आणि या पाहुण्यांसाठी झोमॅटोकडून जेवण त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे.
लग्नाबद्दल सांगताना संदिपन सरकार म्हणाला, “गेल्या वर्षभरापासून आम्ही लग्न करण्याचा विचार करत होतो, पण महामारीची समस्या गेल्या दोन वर्षांपासून कायम आहे. आपल्या पाहुण्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि कोविड नियमांनुसार दोनशेहून अधिक लोकांना आमंत्रित करून नियमांचे उल्लंघन न करता गूगलमीटवरून लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुण्यांना या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवर लग्नाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद आपापल्या घरात आरामात बसून घेता येणार आहे. आणि झोमॅटोद्वारे पाहुण्यांना जेवण त्यांच्या घरी पोहचवले जाणार आहे.”
हे ही वाचा:
…म्हणून दापोलीतली शिवसेनेची सत्ता गेली राष्ट्रवादीकडे!
विनयभंग करून पैसे हिसकावून नेणाऱ्याला चोराला २४ तासांतच अटक
वडिलांच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार जास्त? सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट
इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा….पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
संदिपनला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो चार दिवस रुग्णालयात दाखल असताना त्याला ही कल्पना सुचली.
लग्नाला केवळ १०० ते १२० पाहुणे उपस्थित राहून हजेरी लावतील, तर ३०० हून अधिक पाहुणे लग्नाचे थेट प्रक्षेपण पाहतील. आमंत्रित केलेल्या सर्व लोकांना लग्नाची लिंक आणि पासवर्ड लग्नाच्या एक दिवस आधी मिळणार आहे. टेलीग्राफ इंडियाशी संभाषणात झोमॅटोच्या अधिकाऱ्याने संदीपन आणि अदितीच्या या निर्णयाचे खूप कौतुक केले.