नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती

बाजार समित्यांमधील पारंपरिक कायदे आणि व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते. ही फसवणूक टाळण्यासाठी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना खासगी बाजार समित्यांची उभारणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याअंतर्गत शेतकरी कंपनीला देशातील पहिली बाजार समिती उभारण्याचा मान नाशिकच्या ‘सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर’ कंपनीला मिळाला आहे.

राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांच्या हस्ते बुधवार, २ नोव्हेंबर रोजी पुण्यामध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर या कंपनीला खासगी बाजार समितीचा परवाना प्रदान करण्यात आला. सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्याकडे हा परवाना सुपूर्द केला गेला.

हे ही वाचा:

घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….

दादर, ठाणे रेल्वे स्टेशनवरील ‘स्टॉल’ उचलणार

अमृता फडणवीस यांना म्हणून नको आहे ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन

ब्रिजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, मनसे विरोध करणार?

बाजार समित्यांमधील पारंपरिक कायदे आणि व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक टाळण्यासाठी सरकराने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पणनमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारणेनुसार, आता खासगी बाजार समित्या उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याबद्दल बोलताना पणन संचालक सुनील पवार म्हणाले, शेतमाल पणन व्यवस्था सुधारणांतर्गत शेतमाल विक्री व्यवस्थेतील बाजार समित्‍यांची एकाधिकारशाही कमी करण्यासाठी थेट पणन, एकल परवाना, खासगी बाजार समित्यांचे परवाने देण्याची सरकारची भूमिका आहे. यानुसार राज्यात ७३ खासगी बाजार समित्यांना परवाने देण्यात आले होते. मात्र, अद्याप शेतकरी उत्पादन कंपनीने स्वतःची खासगी बाजार समिती उभारली नव्हती. यामध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीने अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना परवाना देण्यात आला आहे. यामुळे सह्याद्री कंपनी खासगी बाजार समिती उभारणारी देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे.

Exit mobile version