आपण आतापर्यंत एटीएममधून पैसे काढताना पाहिले आहे. पण आता एटीएममधून धान्य सुद्धा बाहेर काढता येणार आहे. ओडिशामध्ये असे एटीएम बसवण्यात आले आहेत, ज्यामधून ध्यान बाहेर पडणार आहे. खरेतर, अन्न क्षेत्रातील एका मोठ्या तांत्रिक विकासामुळे भारताला पहिले धान्य एटीएम (धान्य वितरण मशीन) मिळाले आहे. ओडिशाचे अन्न मंत्री कृष्ण चंद्र पात्रा यांनी ८ ऑगस्ट रोजी भारतातील जागतिक अन्न वितरण कार्यक्रमाचे उपकंट्री डायरेक्टर नोजोमी हाशिमोटो यांच्या उपस्थितीत ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ लाँच केले आहे. भुवनेश्वरच्या मंचेश्वर भागातील एका गोदामात हे धान्य मशीन चालू करण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मशीन ५ मिनिटांत ५० किलो धान्य वितरित करू शकते. लवकरच ओडिशाच्या इतर जिल्ह्यांमध्येही अशीच एटीएम सुरू केली जाणार आहेत.
मंत्री पात्रा यांनी सांगितले की, ग्रेन एटीएममधून धान्य घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. कोणताही शिधापत्रिकाधारक त्याचा/तिचा आधार किंवा शिधापत्रिका क्रमांक टाकून आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर धान्य घेऊ शकतो. हे मशीन चोवीस तास तांदूळ/गहू वितरीत करेल. तसेच ते पाच मिनिटांत ५० किलो धान्य वितरित करू शकते. विजेवर चालणारे हे एटीएम दर तासाला फक्त ०.६ वॅट्स वापरते. या मशीनला सौर पॅनेलला देखील जोडले जाऊ शकते.
हे ही वाचा:
काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला
भिवंडीतून ८०० कोटींचे लिक्विड एमडी ड्रग जप्त, गुजरात एटीएसची कारवाई !
‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’
मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना १७ महिन्यानंतर जामीन
ओडिशा सरकार आणि WFP च्या पुढाकार
ओडिशा सरकारने २०२१ मध्ये जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) सह अनेक भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या काही प्रकल्पांमध्ये वितरण व्यवस्था, धान खरेदी, धान्य एटीएम, स्मार्ट मोबाइल स्टोरेज युनिट यांचा समावेश आहे.