जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) नव्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत नवा वाद सुरू झाला आहे. नव्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने मान्यता दिली आहे. मात्र विद्यापीठातील एका गटाकडून अजूनही या अभ्यासक्रमाला विरोध कायम असून काही प्राध्यापकांनी हा अभ्यासक्रम सध्याच्या काळात गरजेचा असल्याची भूमिका घेतली आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने अभ्यासक्रमास परवानगी दिल्यामुळे तो आता विनाअडथळा सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या ‘काउंटर टेररिझम’ या विषयातील मजकुराबद्दल डाव्या विचारांच्या संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यासंबंधित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार बिनॉय विश्वम यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र पाठवून आक्षेपही नोंदवला आहे. इस्लामिक जिहादी दहशतवाद हा मूलतत्त्ववादी धार्मिक दहशतवादाचा एकमेव प्रकार आहे, असे या मजकुरात म्हटले आहे. साम्यवादी राजवटीवर टीकात्मक लिखाण आहे, त्याला विश्वम यांनी आक्षेप घेतला आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर
हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा
विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली. १७ ऑगस्टला कार्यकारी मंडळाने अभ्यासक्रमाला मान्यता दिल्याने हा अभ्यासक्रम अध्यापनासाठी खुला झाला आहे. विद्यापीठातील अनेक प्राध्यापकही हा अभ्यासक्रम आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत आहेत. अफगाणिस्तानचा ताबा तालिबान्यांनी घेतला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय संबंधांचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात काय अयोग्य आहे? असा प्रश्न इंटरनॅशनल स्टडीजचे प्राध्यापक अरविंद कुमार यांनी विचारला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीशकुमार यांनी देखील या अभ्यासक्रमाचे समर्थन केले आहे.
दहशतवाद हा भारतच नव्हे; तर जगासमोरील आव्हान आहे. त्याचा मुकाबला कसा करायचा याचे ज्ञान विद्यार्थ्यांना असायला हवे. त्याअनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना आहे, अशी भूमिका विद्यापीठाची आहे.